मित्रांनो, सध्या माझे भान हरपुन टाकणारे दिवस चालुयत कारण, स्पर्धा परीक्षेमधील तुमच्या अभ्यासाला सरावाची जोड देणा-या माझ्या तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रैक्टिस पेपर्संना तुम्हां-आम्हां, सर्वांना बेभान करुन टाकणारा असा उदंड प्रतिसाद मिळतोय...!
यात तुमचीही साथ आहेच. ज्यांनी ज्यांनी हा सराव प्रश्नपत्रिका संच मागवून सोडवला आहे त्यांना 'आत्मविश्वास आणि जिद्द' या शब्दांची साक्षात प्रचिती आलीय असे हजारो जणांचे मला आलेले मेसेजस आणि कॉल्स सांगतायत.
यामुळे, माझ्यातल्या 'माणसाला ', तुमच्यासाठी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आणखीन दर्जात्मक, चांगलंचुंगलं वेचुन तुमच्या पदरी हे 'ज्ञानाचे दान' टाकण्यासाठी प्रचंड प्रेरणा मिळत आहे हे नक्की.
काहीजण प्रत्यक्ष भेटुन, इतके अभ्यासपूर्ण, सखोल, मुद्देसुद आणि महत्त्वपूर्ण प्रैक्टिस पेपर्स सर्वांपर्यंत पोहोचविण्याबद्दल माझे अभिनंदन, कौतुक करीत आहेत आणि हिच माझ्या स्पर्धा परीक्षेतील कार्याची पोचपावती मी समजतो.
राखेतुनही, उतुंग झेप घेणा-या फिनिक्स पक्षाप्रमाणे 'थेट ढगातली फिलींग' मी तुमच्यामुळे अनुभवू शकत आहे. कारण हजारोंच्या संख्येने तुमच्यासारखे विद्यार्थी प्रैक्टिस पेपर्स मागवित आहेत. स्पर्धा परीक्षेतील माझ्यापेक्षाही मोठे कार्य करणा-या काही मान्यवर व्यक्तींही, मी तयार केलेल्या या प्रैक्टिस पेपर्सचे विशेष कौतुक करीत आहेत. त्यांच्या शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडल्यामुळे माझ्यातल्या 'लेखकाचा' कणा आणखीनच ताठ झाला आहे. आता, नेटाने आणि धैर्याने या चांगल्या व प्रामाणिक मार्गाने चालत रहायचे जिथे तुमच्यासारखे सुजाण वाचक, जिद्दी विद्यार्थी, सकस विचारांचे मित्र मला भेटत राहतीलच...!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा